मन पाखरू निळे
मन पाखरू निळे
त्यात आभाळ रंगले
रंगरंगी मिसळले
नाही वेगळे उरले
राती काजळ दाटले
पहाटेला उमलले
गर्द केशराचे मळे
दूर क्षितिज रंगले
पाखराच्या गळ्यातले
सुर आकाशी नादले
दिव्य तेज मिसळले
सोनरंगी झळाळले
झाकोळाने गळलेले
बळ पंखांस लाभले
निळे स्वप्न साकारले
डोळी हासू विसावले
-------------