संकल्प
एकदा सुटलेला बाण परत येत नसतो
विचार न केल्यामुळे माणूस स्वतः फसतो
एकदा बोललेला शब्द वापस घेता येत नाही
जीभ टाळ्याला लावण्यापूर्वी विचार का तू करत नाही?
निघून गेलेली वेळ परत कधीच येत नाही
दवडण्यापूर्वी तू विचार का करत नाही?
एकदा गेलेला प्राण परत कधीच येत नाही
जित्यापनी प्रेमाची संधी का तू घेत नाही?
क्षणभंगुर मजेसाठी जीवाशी का खेळतो?
नशेमध्ये गुंग होऊन गटारीमध्ये लोळतो
या नवीन वर्षामध्ये संकल्प एक कर तू
आनंदाचे नवीन जीवन जगणे सुरु कर तू
-स्वप्नील वायचळ