समुद्रकिनारी उभी ती...त्या अमर्याद पाण्याकडे पाहत...
काही तरी विचार केला तिने..मग बसली स्वतःशीच हसत...
झाली तिला आठवण...
असच काही वर्षापूर्वी...होती ती अशाच एका समुद्राकडे पाहत...
पण तो समुद्र होता खूपच भिन्न...जितका विशाल..तितकाच प्रेमळ...
त्या समुद्रात होती सुर्यालाही गिळायची ताकत...
आणि...चंद्रालाही लाज वाटावी अशी नजाकत...
खार जरी असलं त्याच पाणी...तरी सामावून घेतली होती त्याने एक गोड गम्मत..
लाटा त्याच्या होत्या उसळत...अन फेसाळलेलं तारुण्य होत दूरवर पसरत...
त्याला लगाम घालायची मात्र नवती कुणाची हिम्मत...
आपल्याच तालावर भरती-ओहोटी घेणार तो...अन आपल्याच तोऱ्यात मुक्त बागडणार तो...
आणि इतके असूनही...असंख्य जीवांना आपल्या पाण्यात नाचू देणार तो...
स्वतःवर कितीही प्रेम असलं तरी दुसऱ्यासाठी स्वतःच काही देण्यास कधी हि मागे पुढे न पाहणारा तो...
अचानक तिला जाग आली..
समोर तिच्या असाच एक समुद्र...
पण हा मात्र कोमेजलेला...
चंद्राच्या तालावर भरती-ओहोटी घेणारा....आणि सूर्यास्त होताना स्वतःचा निळा रंग टाकून लाल होणारा...
हा सुद्धा अमर्याद...पण स्वताची ओळख विसरून उगाच लांबवर पसरलेला..
इतका खारट कि मृत असल्यागत एकटेच आयुष्य जगणारा...
अन चेहरा त्याचा इतका काळवंडलेला...कि एखाद्याला प्रश्न पडावा...
हाच का तो...लाटांमध्ये फेसाळणारा....
हसली ती स्वताशी...अन मनात म्हणाली...
ह्या नियतीने माज्या आयुष्याची वाट लावली..
समुद्र हि चिडला मग...उठला अचानक...अन म्हणाला तिला...
का दोष देतेस नियतीला...जे होणार होत ते होऊन गेलं...
का शाप देतेस स्वताला...जे काही झाल..यात तुज काय चुकल..
दुनियेच्या ओझाखाली दबायला तू नाहीस भ्याड...
अजून हि जाऊ शकतेस ह्या क्षितिजाच्या पल्याड..
घे एक उंच भरारी..अन हो स्वार माझ्या लाटांवर...
जिंकून घे हे जग...आपल्या मैत्रीच्या जोरावर...
-
विजय दिलवाले