Author Topic: कविता जन्मावी लागते..  (Read 1251 times)

Offline mrudugandha

  • Newbie
  • *
  • Posts: 10
कविता जन्मावी लागते..
« on: January 14, 2011, 04:04:38 PM »
मला हि कविता खुप आवडते, माझ्या एका मैत्रिणीने लिहिली आहे. just wanted to share with u all!

कविता

लिहावी म्हणल्यानं
कविता लिहिता येत नसते
ती जन्मावी लागते

एखाद्या हळव्या क्षणी
रुजलेली कल्पना
अंतरंगात जपून
अस्वस्थतेच्या वेणा
असह्य झाल्या, की
प्रसवावी लागते...
कविता जन्मावी लागते.

लिहावी म्हणल्यानं
कविता लिहिता येत नसते
ती उमलावी लागते.....

सुखदुःखाचा दरवळ
ओंजळीत लपवून
घट्ट मिटलेली
एकेक पाकळी
अनाहुतपणे केव्हातरी
मोकळी व्हावी लागते
कविता उमलावी लागते.

लिहावी म्हणल्यानं
कविता लिहिता येत नसते
ती स्फुरावी लागते....

मनाशीच मन
हितगुज करू लागलं, की
शब्द शोधावे लागत नाहीत
अंर्तमनाच्या कोऱ्या पानावर
कविता अनायास
उमटावी लागते
कविता स्फुरावी लागते.

लिहावी म्हणल्यानं
कविता लिहिता येत नसते
ती जन्मावी लागते...

अस्मिता.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रिया...

  • Jr. Member
  • **
  • Posts: 53
Reply
« Reply #1 on: January 14, 2011, 05:37:44 PM »
Sahi ahe