Author Topic: जीवन असच जगायच असत  (Read 5352 times)

Offline marathi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 212
जीवन असच जगायच असत
« on: January 24, 2009, 11:16:08 AM »
थोड दु:ख, थोड सुख झेलायच असत,
कळी सारख सुंदर फुलात उमलायच असत,
जीवन असच जगायच असत.

वार्यासंगे भीरभीरायच असत,
उन्हासंगे तळपायच असत,
पावसासंगे बरसायच असत,
जीवन असच जगायच असत.

अत्तरासंगे दरवळायच असत.
भुग्यासोबत गुणगुणायच असत,
जीवन असच जगायच असत.

फुलपाखरसंगे फिरायच असत,
सप्त रंगात डुबायच असत,
जीवन असच जगायच असत.

भुतकाळासंगे आठवायच असत.
वर्तमानासंगे खुलायच असत,
जीवन असच जगायच असत.


दु;खाला जवळ करुन भवीष्यकाळ घडवायचा असतो.
जीवन असच जगायच असत. .

Marathi Kavita : मराठी कविता


Ganesh sontakke

  • Guest
Re: जीवन असच जगायच असत
« Reply #1 on: December 19, 2012, 05:04:47 PM »
I like it