माझ्या आयुष्याचा तू रचलास पाया
कधी दूर केली नाहीस वात्सल्याची छाया
तुला वंदन आई म्हणून,
त्याही आधी एक स्त्री म्हणून !!!
निपुण, कुशल, पतिव्रता तू, आदर्श पत्नी
दोन्ही आघाड्या लढवल्यास, शिक्षीका आणि गृहिणी
तुला वंदन पत्नी म्हणून ,
त्याही आधी एक स्त्री म्हणून !!!
भावंडांवर प्रेमाचा वर्षाव केलास निस्वार्थीपणे
सुखच दिलेस सर्वांना, झीजलीस चंदनाप्रमाणे
तुला वंदन बहीण म्हणून,
त्याही आधी एक स्त्री म्हणून !!!
मुलगी असून मुलाचे कर्तव्य पार पाडलेस
वेळ प्रसंगी अतोनात कष्ट ही काढलेस
आज तू वंदनीय ठरलीस तुझ्या आईमुळे
वंदन तिला ही एक स्त्री म्हणून !!!