उगवतीच ऊन आता मावळतीला पोहोचलं आहे,
मार्गक्रमण मार्गापेक्षा स्मरणात अधिक साचलं आहे,
तक्रार नाही, खंत नाही
पुर्तीसाठीच हा माझा प्रवास असतो,
जसा, केव्हातरी मिटण्यासाठीच
काळजामधला श्वास असतो......
................................................अरविंद कुमावत....