तसं पाहायला गेलो तर फक्त एक खेळच आहे
पण खेळताना जणू, युद्धाचा आव आहे,
त्याला क्रिकेट ऐसे नाव आहे
जी सरता सरत नाही, कधी संपत नाही
अशी ज्यात फक्त जिंकण्याची हाव आहे
त्याला क्रिकेट ऐसे नाव आहे
ही आहे संधी, दाखवून द्या जगास
की कोण चोर अन कोण साव आहे
त्याला क्रिकेट ऐसे नाव आहे
लक्ष्य आहे जिंकण्याचे, जिंकायचेच
खेळ फक्त नाही, आयुष्याचा डाव आहे
त्याला क्रिकेट ऐसे नाव आहे!!
-जय