Author Topic: वहीचं पान ..  (Read 4162 times)

Offline vijay_dilwale

  • Newbie
  • *
  • Posts: 27
वहीचं पान ..
« on: March 31, 2011, 05:05:38 PM »
वहीच्या पानांत लिहिलय माझ मन...
काही पाने भरलित...तर काही तशीच कोरी अजून ...
भरलेली तरी कुठे सांगतायत खरी गोष्ट ठासून..
बरीचशी पुसट...तर काहीच आहेत ठळक अजून...

स्वप्नं  पाहिलीत बरीचशी लिहून...
काही उतरली सत्यात...काही अजूनही अर्धसत्यात..तर बरीचशी दिलीत फाडून...
फाटलेली पान जरी ती ...तरी पीच्छा कुठे देतात सुटून...
लक्षात ठेवा..फाटलेल्या पानांचा उभा कोपरा कायम असतो तिथेच चिटकून...



अनुभवलंय बराच काही लिहिता लिहिता...
अर्ध मदमस्त आनंदयात्रीसारखा...तर उरलेलं उनाड पक्ष्यासारख...
आता जरा थोडा काही फक्त स्वतासाठी लिहायचंय..
आयुष्यात परत एकदा प्रेमाच्या अडीच अक्षरांना गिरवायचय.. !!


नवीन कोऱ्या पानांचा वास आता उत्साहित करतोय..
आधी लिहिलेल्या पानांना खुलं आव्हान देतोय...
आता जपूनच लिहायचं जरा..नको ती खाडाखोड पुन्हा...
म्हणतात ना..सुंदर नि सुवाच्य अक्षर हाच खरा दागिना..!!!

- विजय..
« Last Edit: March 31, 2011, 05:12:24 PM by vijay_dilwale »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline amoul

  • Full Member
  • ***
  • Posts: 650
  • Gender: Male
  • tAKE iT eASY
Re: वहीचं पान ..
« Reply #1 on: April 01, 2011, 05:23:30 PM »
लक्षात ठेवा..फाटलेल्या पानांचा उभा कोपरा कायम असतो तिथेच चिटकून...

kya baat hai yar

Offline vijay.dilwale

  • Newbie
  • *
  • Posts: 10
Re: वहीचं पान ..
« Reply #2 on: April 02, 2011, 12:20:23 AM »
dhanyavad...!!

Offline santoshi.world

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,336
  • Gender: Female
  • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
    • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: वहीचं पान ..
« Reply #3 on: April 03, 2011, 12:13:51 PM »
mastach :)

Offline vijay_dilwale

  • Newbie
  • *
  • Posts: 27
Re: वहीचं पान ..
« Reply #4 on: April 03, 2011, 02:48:16 PM »
dhanyvad..!

Offline Rani27

  • Newbie
  • *
  • Posts: 28
Re: वहीचं पान ..
« Reply #5 on: April 08, 2011, 12:33:59 AM »
Agdi manatalch kavitet utarlay.... khupch chan

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा वजा दहा किती ?  (answer in English):