आपल्या मनाच्या कोप-यात दडून बसते 'ती'
कधी वाटत असते तर कधी वाटत नसते 'ती'
तिला कधी स्वप्नांची साथ असते
तर कधी एकटेपण सोसते 'ती'
'ती' आशा
आपल्या मनातल्या मानत लपलेली 'ती'
आपल्यांसाठी दु:खातही जपलेली 'ती'
मनाच्या डोळ्यांतून हृदयाने टिपलेली 'ती'
'ती' आशा
अतूट नाती बांधणारी 'ती'
अश्रूंबरोबर अलगद सांडणारी 'ती'
परक्यांमधलीही आपुलकी सांगणारी 'ती'
'ती' आशा
'ती' आहे म्हणूनच जीवनाला अर्थ आहे
'ती' आहे म्हणूनच जगण्याचे सामर्थ्य आहे
'ती' नसेल तर जगणेच व्यर्थ आहे
'ती' आशा
- गोजिरी