मराठी कविता - कवितांचे माहेर
सोयीस तुमच्या उभे मराठी कवितांचे माहेर
उपयोगास याच्या ना कुठली वर्गणी ना आहेर
सुप्तगुणांना वाव मिळावा म्हणून ही धडपड
उपयोगी आणा सुवर्ण संधी ही लवकर
चला मुलानो आणि मुलीनो दाखवा तुमची क्षमता
व्यासपीठ हे तुमच्यासाठी स्फुरू दे मराठी कविता
कल्पनांच्या विश्वामधले आहात तुम्ही पक्षी
काव्याच्या वस्त्रावर बनवा शब्दांची नक्षी
परंपरा कवितांची थोर संत महात्म्यांची
गरज आहे केवळ आपल्या खऱ्या प्रयत्नांची
साहित्याची उंच शिखरे या मिळून गाठू
मायमराठी असल्याचा दे अभिमान वाटू
-स्वप्नील वायचळ