माय राबता राबली
या उन्हात तान्हात
हात फूटतिया तिच
दगडामातीच्या कामात
माय राबता राबली
या उन्हात तान्हात
तिच सपान र लई
म्या शिकाव शिकाव,
तिच पोळलेल हात
म्या मुक्याच पहाव
डोळे भरूनिया दोघ
अहो रडे रात रात
माय राबता राबली
या उन्हात तान्हात
उन वारा पाहिना
घन मारे कोयल्यावर
तिकडे चेतलिया भट्टि
मेहंदि येई हातावर
पाय बोले फुफाट्याला
काय र तोह मोह नात
माय राबता राबली
या उन्हात तान्हात
आमचा चिमणिवाणी जीव
काम करे वाघावाणी
सारे देवदुत खोटे
नाहि कुणी आईवाणी
डोळे भरतिया तिचे
मोह्या सागर डोळ्यात
माय राबता राबली
या उन्हात तान्हात
फिरोज