कल्पनेला माझ्या नसतात सीमा
नसतेच बंधन कसले
छान असते तिथले जीवन
असतो गंध ओल्या मातीचा
फुलतो तिथेच पारिजात
असतो सतरंगी तो इंद्रधनू तिथेच
असते संपूर्ण माझे जीवन
वाटत कधी कधी का बरे पहावी हि दिवास्वप्ने
का हवी उगाच खोटी रंगरंगोटी
पण नाही.. असतात ते क्षण खरच अनमोल
जरी नसेल काही जवळ माझ्या तरीही असतो हा विश्वास
ह्या आशेनेच तर होतात दुखांचे डोंगर सर
हवे असतात फक्त प्रयत्नांचे पाय
रडलेय कित्येकदा आयुष्यात मी
नक्कीच त्यापेक्षा जास्त हसलेय उगाच मी
कारण असतात ह्याच सुंदर कल्पना आणि त्याला असते वास्तवाची जोड...
-- राणी