Author Topic: प्रभू चरणी वंदन  (Read 2021 times)

Offline gparimal_v

  • Newbie
  • *
  • Posts: 9
  • Gender: Male
    • मनोगत
प्रभू चरणी वंदन
« on: May 24, 2011, 07:50:10 AM »

सुभद्राकुमारी चौहानांच्या 'ठुकरा दो या प्यार करो' या कवितेचा मी भावानुवाद केला आहे.

देवा तुझे भक्त तुझ्या दारी अनेक प्रकारे येती |
तव सेवेस्तव अनेकरंगी वस्तू आणती |

सजूनिया वाजत गाजत तुझ्या मंदिरी ते येती |
सुवर्णरत्नासम  मूल्यवान वस्तू तुला अर्पिती |

मी एक गरीब काही हि न घेवून आलो |
तरीही साहस करुनी पुजेस उभा राहिलो |

धूप दीप नैवेद्य नसे अन बहुरंगी आरास नसे |
चरणी  तुझ्या वाहण्यास  फुलांचा हारही नसे |

गुणगानास्तव तुझिया स्वरात माधुर्य नसे |
सांगण्यास भाव मनीचे वाणीचे चातुर्य नसे|

नसे दान अन  नसे दक्षिणा रिकाम्या हातीच आलो|
न ठाऊक पूजाविधी तरीही तुझ्या दर्शनास आलो |

पूजाविधी न ठाऊक मजला ठेवतो मन तुझ्या चरणी |
दान दक्षिणा नसे परंतु भक्ती तुझी असे सतत मनी |

तव प्रेमाचे  तहानलेले हृदय घेवूनीया आलो |
एवढेच आहे मजपाशी तेच अर्पिण्यास आलो |

चरणी तुझ्या अर्पितो मन यापरते काय सांगू |
हे तर तुझीच देणगी  कर याचा स्वीकार प्रभू |


©परिमल विश्वास गजेंद्रगडकर
२२ / ०५ /२०११

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा वजा दहा किती ?  (answer in English):