ॐ साईं.
“शब्द-सुमन” ©चारुदत्त अघोर(२०/४/११)
या नजरेनं तुला,भरून साठवू दे,
क्षण तुझ्या पाउलीचा,नेहेमी आठवू दे;
तुझीच प्रतिमा सदैव, स्मृतीत राहू दे;
वेचले शब्द-सुमन तुझ्या,चरणी वाहू दे..!
जंगले जीवन माझे,तुझ्या नामी उजळू दे,
काही उरले ज्ञान,संन-मार्गी पाझळू दे;
चित्ती माझिया ध्यान, तुझेच राहू दे;
वेचले शब्द-सुमन तुझ्या,चरणी वाहू दे..!
उघडे पितळ आज,उजळून घासू दे,
नामस्मरणी सोने,आज तासू दे;
नाश्वरी शरीर धातू,वितळूनी नाहू दे;
वेचले शब्द-सुमन तुझ्या,चरणी वाहू दे..!
भरले नयन कडी,अश्रू गाळू दे,
हर थेम गुंफून,आज माळू दे;
निर्माल्यं वेदनेचे,अनंती जाहू दे;
वेचले शब्द-सुमन तुझ्या,चरणी वाहू दे..!
काय देशील ते,मनी स्वीकारू दे,
दिलं ते जपून,पुण्याकारू दे;
उरीत पडते बीज,धरणी बोहू दे;
वेचले शब्द-सुमन तुझ्या,चरणी वाहू दे..!
जगी कुठेही असता,बोटी तुझ्याच मुठवू दे,
दिन रात्री झोपलो असता,तूच उठवू दे,
कर आग्रे तळवी घर्शून,तुलाच पाहू दे,
वेचले शब्द-सुमन तुझ्या,चरणी वाहू दे..!
हर कांड अन्गुलीचा,मणी रुपी नामू दे,
हर श्वास शरीरीचा,माळ रुपी रामू दे;
लक्ष लक्ष जपवून,मी ब्रह्म पाहू दे;
वेचले शब्द-सुमन तुझ्या,चरणी वाहू दे..!
इच्छा टाकून सर्व,निवृत्ती जागवू दे,
अखंड ध्यान-दीप,ज्योती आगवू दे;
ज्ञान प्रकाश नित्य,आज पाहू दे;
वेचले शब्द-सुमन तुझ्या,चरणी वाहू दे..!
अध्ययन करुनी मी,आत्मा अध्यात्मू दे,
अहं-ब्र्म्हीत होऊनी, आज परमात्मू दे;
नाद वलयावुनी,ओंकार स्थित राहू दे;
वेचले शब्द-सुमन तुझ्या,चरणी वाहू दे..!
चारुदत्त अघोर(२०/४/११)