इवल्याशा डॉळयांत
आभाळाएवढी स्वप्नं घेउन..
रोज कोवळया ,ताज्या पहाटॅ उठते.,
लाल , तांबडया सूर्याला पाहून..
तेजस्वी बनण्याची एक उर्मी घेऊन..
कोवळया ऊन्हाचा तजेला घेऊन..
वार्याचा वेग अन् ढगांच बळ घेऊन..
नवीन दिवसाची सुरुवात करते..
पंख लावून उडते अवकाशात माझ्या..
फुलपाखरांच्या पंखावरल्या रंगांत मिसळून जाते..
पाण्यातल्या प्रतिबिंबात..
तरंगत राहते,
लव्हाळींचा गुंता सोडवत..
फुलांच्या पा़कळ्या कुरवाळत..
त्यांचा मऊपणा शोधत राहते..
धुक्यांच्या दुलईत..
रस्त्त्यांवारल्या आवाजांत..
चुलीच्या धुरात..
गुरफटून घेते स्वताला,
भान हरपून गाणं गाते,
आणि सांडते लोकांच्या हास्यांत..
मावळत्या सूर्याला अर्घ्य दिलेल्या..
ओंजळीतल्या पाण्यात मिसळून जाते
अन् सागराच्या लाटांत..
हेलकावत राहते,
आकाशाने निळंभोर , चंदेरी वस्त्र पांघरल्यावर,
दमून भागून थकल्यावर..
शांतपणे रात्रीच्या कुशीत..
मऊ ढगांच्या ऊशीत,
निजून जाते..
पुन्हा नवीन स्वप्नं पाहण्यासाठी....
-jay