पाऊस कोसळतोय, बाहेर अन मनातही
पाणी पाणी झालंय सारं,
ओघळतयात शब्द नभातून,
काव्य करतंय उधान वारं
जणू सांगतंय मर्म जगण्याचं
कवटाळून सुखानंसोबत जगण्याचं
गळून जातील थेंब दुखांचे
उरले आभाळ सुखांचे
क्षणिक मोहाचं जाळे
चित्त विचलित करणारं
नाती दुरावती प्रेमळ
एकटं एकटं करणारं
आहे ते आनंदाने स्वीकार
व्यर्थ चिंता काय बरे?
जग दुसर्यांसाठी थोडे
आपल्याला काय उणे ?
धन संपत्ती तर सगे सोयरे
कागदी पाचोळा का हवा?
प्रेमाने जग जिंकता येतं
हाच खरा मूलमंत्र नवा
मैत्रेय (अमोल कांबळे)