समुद्रकीनारी त्या दिवशी पाउले चार पाहिली
दोन होती माझी दोन देवाची राहिली
देवा तू असशी माझ्या संगती
जेव्हा असती सुखच्या पंगती
परंतु दीसती दोनच पाउले मजसी
जेव्हा असे मी दुखी संकटी
माझा प्रश्न ऐकून देव हसला
मजला जवळ घेऊनी तो सहज उत्तरला
"हे मनुष्या, विसरशी तू
मीच असे तुझा पालक
सुखाच्या पंगती मे असे तुझ्या संगती
दुखी संकटी तुज दिसती
माझीच दोन पाऊले
मीच होते तुला उचलून घेतले"
........अमोल कशेळकर