तू सच्च्या नेक दिलाचा तू भक्त निर्भयतेचा
तू शिष्य खड्ग बाणाचा तू खरा वारस त्यांचा
तुज पडछाया कोणी म्हणती ते देवाजीचे देणे
परी हार मानणे नाही तू लढशी नव्या दमाने
तू समर्पण केले होते तुज ठावूक धावून जाणे
शब्द पेलण्या त्यांचा सत्वर झोकून देणे
तुज आशिष त्या विभूतीचा म्हणुनी ओठावरी गाणे
आठवोनी पराक्रम त्यांचा तुज सुसह्य होई जगणे
भन्नाट असे जगताना तुज माहित नव्हते कुथणे
तुज आवड वेड्या भारी अंगावर वादळ घेणे
तू अभिमन्यू गत लढशी रुचे तुज वादळ होणे
तू नेक शिवाचा छावा संपदा दिली तव प्रभूने
तू अन्यायास्तव लढशी सखे येतील नव्या दमाने
दावतील जखमा त्यांच्या घाल फुकार तू प्रेमाने
पाहता पाहता सारे हृदयाची उघडतील दारे
देवून दीर्घ ललकारी म्हणतील मनसेत चलारे
तुलाच होणे आहे राम कृष्ण या जनतेचा
येतील सखे सोबत दे स्पर्श त्यांना परिसाचा
करू तूच बगावत जाणे तुलाच जमले लढणे
तू नेता रे तरुणांचा सख्या लढ तू निर्भयतेने
-मंगेश कोचरेकर