उठ मराठी उठ,
उत्तुंग तुझी ती इच्छा शक्ती,
गगनास ही धरणीस मिळवी,
घे पुन्हा गरुड झेप तुझी ती,
सप्त समुद्र ही बघू लाजवी,
उठ मराठी उठ.
सळसळ ते रक्त तुझे ते,
सागरासही उफान देई,
चमचमती तलवार तुझी ती,
वादळ ही बघू थर कापी.
उठ मराठी उठ.
पेटून वणवा दाही दिशी,
वाजवुनी डंका त्रिलोकी,
मिर्वूनी भगवा सातव्या आकाशी,
उठ मराठी उठ.
उभा सह्याद्री तुझं पुकारी,
सागरही तुझं नमन करी,
चातकी वाट बघी तुझी माय मराठी,
उठ मराठी उठ.
मेहर राळेकर..........