Author Topic: व्यथा मराठीची.  (Read 1847 times)

Offline dattajogdand

 • Newbie
 • *
 • Posts: 15
 • Gender: Male
  • www.majyakavita.co.cc
व्यथा मराठीची.
« on: October 24, 2011, 12:05:23 AM »चाल (जिवलगा राहिले रे दूर घर माझे)


जिवलगा.. राहिले रे दूर घर माझे
बोलून थकले, माथ्यावरचे जड झाले हिंदी

............. ‍जिवलगा..हिंदी बोलते भैया-भाबी

लाज सभोती दाटून येई

सुखकिरणांची विरली छाया, पाचोळा वाजे।... ‍जिवलगा..


मान कालचा मागे पडला

पायदळी तो परक्या चुरडला

ही घटका ती, सुटे मराठी, विजयी ढोल वाजे।... ‍जिवलगा..


निराधार मी माय मराठी

घेशील केंव्हा मज ह्रदयासी

तूच एकला, तार अनाथा, महिमा तव गाजे।.... ‍जिवलगा..

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: व्यथा मराठीची.
« Reply #1 on: October 24, 2011, 11:17:17 AM »
saty vachn...