पुन्हा झाली आठवण
खूप गोड होते बालपण
निरागस होते मन
नव्हता मोह! काय असते धन?
लुटला होता आनंद
परंतु त्याचा फक्त उरला आहे गंध
जस जसे मोठे झाले
बालपण दूर कोठे हरवून गेले
पण जेव्हा बालपण सुटले
तेव्हा तरुणाने गाठले
नवं स्वप्नांनी भारावले
विश्वाचे रूप प्रथमच पहिले
लागला काही वेळ
गर्दीशी साधायला मेळ
नव्या विश्वाचे आव्हान मोठे
पुन्हा वाटले आपणं आहोत छोटे
जिद्दीची, स्पर्धेची तरुणाई
तसेच मदतीला धावून येई
मला वाटते या विश्वात
आकांक्षा, अपेक्षा, यश यांमध्ये न्हात
पुढे पुढे जयायचे
प्रत्येक आव्हानाला सर करायचे
त्यात आले अपयश जरी
आत्मविश्वास ठेवून भारी
मानायची नाही हार
कारण आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार
संध्या पगारे