परत लहान व्हावस वाटतंय...
शाळेत जाताना परत रडावं वाटतंय
चोकलेटसाठी परत हट्ट करावा वाटतंय
परत लहान व्हावस वाटतंय.
अबडक खबडक चा घोडोबा व्हावस वाटतंय
सुपरमन चा ड्रेस घालावासा वाटतंय
परत लहान व्हावस वाटतंय
दिवाळीच्या सुटीत मामाकडे जाव वाटतंय
पेरू-ऊसं खावास वाटतंय
परत लहान व्हावस वाटतंय
सायकल शिकताना पडून खरचाटाव वाटतंय
दिवाळीच्या सुटीतला अभ्यास कराव वाटतंय
परत लहान व्हावस वाटतंय.
विज्ञान प्रदर्शनात व चित्रकलाच्या स्पर्धेत भाग घ्यावास वाटतंय
पारितोषिक वितरणात उत्तेन्जानार्थ बक्षीस घ्यावास वाटतंय
परत लहान व्हावस वाटतंय.
~Vishal.Pharmacist