Author Topic: नववर्ष  (Read 1891 times)

Offline Gyani

 • Newbie
 • *
 • Posts: 18
 • Gender: Male
  • Gyani
नववर्ष
« on: December 31, 2011, 09:26:08 PM »
हि कविता संपूर्ण वाचा.......

 आज संपूर्ण जगामध्ये,  न्यू यीअर चा धमाका !

 फेसबुक ट्विटर वर तर, अक्षरशः:फोटोंचा सडाका !!

 तरुणाई सर्व बेधुंद होऊन, मस्ती मध्ये नाचत आहे !

 लोकशाही मात्र संसदेमध्ये, गटांगळ्या खात आहे !!

 तरुणांच्या डोळ्यामध्ये 31st  चा धुमाकूळ आहे !

 अरे पोरानो जरा जीवाला जपा, रात्र वैऱ्याची आहे !!

 नसानसात भिनला यांच्या, न्यू यीअर चा जल्लोष आहे !

 गरीब शेतकरी अन्नावाचून, पूर्णत: व्याकुळला आहे !!

 जगू द्या स्वाभिमान तुमचा,आज नव्या लढ्यासाठी !

 पेटू  द्या रक्त तुमचे,वाचाविण्या पुन्हा देशासाठी !!

 येऊ द्या अंगात तुमच्या, बळ ते अश्वा सारखे !

 समरास या सज्ज होऊनी,पुढे जाऊ वीरां सारखे !!

 नववर्षाला घेऊन संगे, आज एक प्रतिज्ञा करू !

 सारे मिळूनी भारताचे या ,परम वैभव प्राप्त करू.....!!

 -ज्ञानेश कुलकर्णी
 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: नववर्ष
« Reply #1 on: January 02, 2012, 01:09:47 PM »
gr8.......