Author Topic: तुला वेड लागलाय....  (Read 2106 times)

Offline balrambhosle

  • Jr. Member
  • **
  • Posts: 122
  • Gender: Male
तुला वेड लागलाय....
« on: January 06, 2012, 04:50:20 PM »
तुला  वेड लागलाय....
अग मुली तुला  वेड लागलंय.........
तोंडाला मुंगस बांधून चेहरा लपवतेस..
आणि येणाऱ्या जाणाऱ्या  तरुणांना फसवतेस..
दाखवणं तुझा खरा चेहरा..
काय दडलाय त्यात गुपित..
कळेल मग तू जागे आहेस का चालतेस झोपित..
अग मुलीचं सौंदर्य नसतंय ग चेहऱ्यात..
ते सगळ लपल असते तिच्या हृदयात..
तुझी आय मोकळ्या पायांनीच जाते रानात..
आणि चार पैक कमावते ग उन्हात..
कशासाठी तर फक्त तुझ्यासाठी..
अन सोडते सगळ्या हृदयाच्या गाठी..
आणि तू...छे तू तोंड लपवतेस..
तुझ्या आईचाच न ग तो चेहरा..
ज्याला केलाय तुने बेहरा..
काय केलास अस तोंड लपवण्यासारख..
जे नाही तुला झेपावण्या सारख..
का तुला मुले पटवायाचित..
का चार पैसे साठी कटवायाचित..
अग आईच्या हाताची भाकर..
जशी लागते तुपात साखर..
चांगल नसतंय ते चायनीज फूड..
आणि ते बेकरीचे केक..
हे सगळंच भेटेल तुला
फक्त चार पैसे फेक..
पण आई आणि वडील..तुला कधीच नाही मिळणार..
आणि हे बाहेरच जगच तुला गिळणार..
काढून फेक ते तोंडावरच कुंपण.
 होतु आता नीडर...
आणि बन जगाची लीडर..
विसरून जाय आता सुंदर दिसण्याचा खूळेपना..
अन बिघडलेल्या मुलिंवरचा जळेपणा
मन स्वच कर आणि आईच्या भावना जाप..
लागलाच तर कर शिकण्याच कठोर तप...
तुला वाटेल माझ का अडतंय..
कारण माझ्या समोर हे घडतंय..
आणि मला हे कळतंय..
म्हणून म्हणतो तुला..
तुला वेड लागलंय..
___ बळीराम भोसले
« Last Edit: January 06, 2012, 04:50:59 PM by balram04 »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline mahesh4812

  • Jr. Member
  • **
  • Posts: 274
Re: तुला वेड लागलाय....
« Reply #1 on: January 06, 2012, 10:18:03 PM »
nice