Author Topic: मित्र असावे तर असे..  (Read 3398 times)

Offline Rohit Dhage

  • Jr. Member
  • **
  • Posts: 221
  • Gender: Male
  • Show me the meaning of being lonely....
मित्र असावे तर असे..
« on: January 21, 2012, 12:27:23 AM »
हो मी आहे अजुन..
कितीही शून्यात दुनिया गेली तरी पलिकडे पाहणारा
मी आहे अजुन..
थोडी धूळ बसली होती..
जळमटे साचली होती..
झटकलीस तू..
आता दिसतंय मला..
अगदी स्वच्छ...
किती मी पाण्यात आहे आणि किती मी स्वतःच पाहतोय!
तुझे शब्द साठवतोय..
अगदी पूरक आणि परिपूर्ण असे शब्द..
त्याची किंमत करणे शक्य नाही ,,
मित्र असावे तर असे ..

तोतया खूप भेटले..
अगदी खरेखुरे वाटणारे,
गळ्यात गळे घालणारे,
तू लांबून जे तीर दिलेस..,
त्यांनी स्वैर मला तारले....
या वाहवत जाणाऱ्या वादळापासून..,
धन्यवाद..
त्रिवार धन्यवाद,,,
मित्र असावे तर असे..
- रोहित
« Last Edit: January 21, 2012, 09:28:48 AM by Rohit Dhage »

Marathi Kavita : मराठी कविता