Author Topic: माझी गाणी :विज्ञान अभंग  (Read 2238 times)

Offline prasad26

  • Jr. Member
  • **
  • Posts: 103
मराठी ब्लॉग वर आत्तापर्यंत केलेल्या कविता, गाणी प्रकाशित कराव्यात असे बरेच दिवस मनात होते पण वेळ आणि मुहूर्त मिळत नव्हता.  प्रथम कोणते गाणे / कोणती कविता प्रकाशित करावी संभ्रम पडला। शेवटी मी बरीच वर्षे शास्त्रन्य म्हणून काम करत असल्याने माझा "विज्ञान अभंग " प्रथम येथे लिहावा असे ठरवले. 
सदर अभंग हा -- माझे Ph D चे प्रथम गुरु डॉ माशेलकर हे जेह्वा आमच्या संस्थेचे निर्देशक झाले व त्यांनी जे संस्थे मधे प्रथम भाषण केले - त्यावर आधारित आहे.

विज्ञान अभंग
विज्ञानाचा घ्यावा ध्यास
विज्ञानाचा घ्यावा श्वास
विज्ञानात करा वास
युग हे विज्ञानाचे ॥ ध्रु ॥

कठीण श्रमाने, विज्ञानाचे घेता धड़े
अमृताचे घड़े बहु, लागतील हाती ॥ १॥

शोध कार्य करण्या, व्हावे तुम्ही अगतिक
मिळो  कीर्ति जागतिक, असो ध्येय मनी ॥ २॥

खरा गुरु आहे , विज्ञानाचा ग्रन्थ
दाखविण्या सुपंथ, सदैव हज़र ॥ ३॥

गुरु जे वदले, केले मी कथन
करावे जतन तुम्ही, प्रसाद म्हणे ॥ ४॥

----प्रसाद शुक्ल