Author Topic: मी मराठा वारस शिवबाचा . . .  (Read 2278 times)

Offline Deepak Pardhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 162
 • Gender: Male
 • Deepak Pardhe


मी मराठा, मी मराठा, जगतो, लढतो मराठा,
धुळ चारुन गनिमास, पुरुनी असा उरतो मराठा,
मायभूमी धन्य ती, जन्मला एक थोर मराठा,
स्वराज्याचे तोरण बांधुन, नडला तो एक मराठा . . .

हिंदवी स्वराज्य तो, तळपतो, तडपतो,
गुलामीची साख तोडून, एक मराठा लढतो,
काय थोरवी गावी त्यांची, मनी प्रश्न दाटतो,
रयतेचा राजा माझा, अजुनही हवासा वाटतो . . .

थोर असा माझा राजा, ख्याती उभ्या जगात,
आजही जिवंत आहे, आमच्या तनात, मनात,
मराठीचा मान त्या मराठ्यानं मिळवला,
झुकवुन असे गनिमास, हिंदवी स्वराज्य घडविला . . .

स्पृश्य आणि अस्पृश्य न भेद तू मानला,
मी रयतेचा आणि रयत माझी, धर्म मराठी आणला,
जाण ठेवून मनी, इतिहास तुझा वाचिला,
गर्वच नाही तर माज मराठी असल्याचा मग वाटला . . .

नमन करत तुला आशि॔वाद मागतो आहे,
मी मराठा, मी मराठा करत फ़क्त मराठी जगतो आहे . . .

- दीपक पारधे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline prasad26

 • Jr. Member
 • **
 • Posts: 103
Re: मी मराठा वारस शिवबाचा . . .
« Reply #1 on: April 12, 2012, 12:04:08 PM »
chan!

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: मी मराठा वारस शिवबाचा . . .
« Reply #2 on: April 12, 2012, 12:09:51 PM »
 
नमन करत तुला आशि॔वाद मागतो आहे,
मी मराठा, मी मराठा करत फ़क्त मराठी जगतो आहे . . .
नावं मात्र आजूनही इंग्लिश मधेच लिहित आहे....   
 
पारधे साहेब तुम्हाला दुखवायचा हेतू नाही. एक विचार सांगतो. मोठे मोठे बदल हे छोट्या छोट्या गोष्टींतून होत असतात. नुस्त मराठी मराठी करण्यात काय अर्थ आहे. आजूनही मराठी टाईप करायला इंग्लिश किबोर्ड लागतो. गम्मत म्हणून खालच्या ओळी लिहित आहे.   
 
पाणीपुरी साठी मराठी माणसाला
बिहारी भैय्याचा आधार
मराठी टायपिंगला तसा
Googletransliterate चा आधार   
 
कविता खूप आवडली. तुमच्या सगळ्याच कविता खूप वाचनीय आणि छान असतात. तुमच्या भावना दुखावल्या असल्यास क्षमस्व.    केदार... 
« Last Edit: April 12, 2012, 12:11:35 PM by केदार मेहेंदळे »

Offline Deepak Pardhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 162
 • Gender: Male
 • Deepak Pardhe
Re: मी मराठा वारस शिवबाचा . . .
« Reply #3 on: April 13, 2012, 12:11:22 AM »
केदार साहेब धन्यवाद् . . .

प्रथमत खरेच बरे वाटले हे ऐकून की तुम्हाला मी लिहलेल्या कविता वाचायला आवडतात...

आणि राहिला प्रश्न मराठीचा, कसे आहे साहेब, प्रत्येक गोष्ट पूर्ण होण्यासाठी त्या गोष्टीला म्हनुया वा त्या वस्तुला म्हनुया, कित्येक दुसर्या वस्तुंची गरज लागते... जसे आपण म्हणतो टाळी कधी एका हाताने वाजत नाही तिला दुसर्या हाताची गरज लागतेच.... तसेच आहे मराठी असल्याचा जरी माला गर्व असला... तरी मला इतर भाषांची गरज आहेच ... 

आणि राहिला प्रश्न माझ्या कवितेचा... ती तर माझ्या कडून माझ्या राजासाठी आलेली भावना होती... आज जर इतिहासात मराठी माणसाचे अस्तित्व दिसते ते माझ्या राजामुळे... त्यामुळे मी माझ्या कवितेत लिहले आहे....

स्पृश्य आणि अस्पृश्य न भेद तू मानला,
मी रयतेचा आणि रयत माझी, धर्म मराठी आणला,
जाण ठेवून मनी, इतिहास तुझा वाचिला,
गर्वच नाही तर माज मराठी असल्याचा मग वाटला . . .

खरोखर मला बरे वाटले तुमचे म्हनने ऐकून... अशाच तुमच्या प्रतिक्रिया मिळत राहुद्या माझ्या कविताना....


- दीपक पारधे 

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: मी मराठा वारस शिवबाचा . . .
« Reply #4 on: April 13, 2012, 10:20:01 AM »
gr8.... keep posting.