Author Topic: आई मला मोठं व्हायचंय गं . . .  (Read 1361 times)

Offline Deepak Pardhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 162
 • Gender: Male
 • Deepak Pardhe

झुकवून आभाळ सारं, गगणात नाचायचंय गं,
स्वप्नांना कवेत घेऊन,  आई मला मोठं व्हायचंय गं . . .

रांगत रांगत पुढे तुझा हात धरला गं,
प्रत्येक पाऊलाला तुझा संस्कार लाभला गं,
कर्तव्याचे फुल तुझ्या चरणी वहायचंय गं,
स्वप्नांना कवेत घेऊन,  आई मला मोठं व्हायचंय गं . . .

शाळेत शिकताना, तुझे स्वप्नं जाणले गं,
शिकवावे मला खुप, असे तू ठाणले गं,
शिकुन मिळवलेली कला, मला जगाला दाखवायचीयं गं,
स्वप्नांना कवेत घेऊन,  आई मला मोठं व्हायचंय गं . . .

संकटकाळी माझ्या, फक्त आधार तुझा भेटला गं,
तुझ्या रुपात, देवचं पाठीशी उभा राहिला गं,
न घाबरून प्रसंगाला फक्त पुढेच जायचंय गं,
स्वप्नांना कवेत घेऊन,  आई मला मोठं व्हायचंय गं . . .

आता नाही थांबणार कुठे, हा निश्चय केलाय गं,
आली संकटे लाख, त्यांना धुळीत मिळवणार गं,
केलेल्या त्यागाचे तुझ्या, मी सार्थक करणार गं,
स्वप्नांना कवेत घेऊन आई मी नक्की मोठा होणार गं . . .
स्वप्नांना कवेत घेऊन आई मी नक्की मोठा होणार गं . . .

- दीपक पारधे

(माझ्या सगळ्या कविता वाचण्यासाठी माझ्या ब्लोग्सना नक्की भेट द्या.... http://deepakpardhe.blogspot.in/
अथवा मला फेसबुक वर join करा)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: आई मला मोठं व्हायचंय गं . . .
« Reply #1 on: April 26, 2012, 11:08:42 AM »
khup chan..........

Offline Deepak Pardhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 162
 • Gender: Male
 • Deepak Pardhe
Re: आई मला मोठं व्हायचंय गं . . .
« Reply #2 on: April 26, 2012, 12:06:44 PM »

Thanks Kedar Saheb...