Author Topic: खळबळ  (Read 1672 times)

Offline स्वप्नील वायचळ

 • Jr. Member
 • **
 • Posts: 182
 • Gender: Male
खळबळ
« on: May 28, 2012, 05:05:42 AM »

              खळबळ
मध्यरात्र उलटून गेली प्रसन्न नाही निद्रा
मनात माजे खळबळ गहन विचारी मुद्रा

काळ बदलला तसे बदलले मापदंड यशाचे
पैशामागे स्पर्धा सारी नाही भान कशाचे
अफाट कमवून मजा करावी केवळ चंगळ वृत्ती
नैतिकतेची मुल्ये आहेत टांगत वेशीवरती

आधुनिकतेच्या काळामध्ये किती पहा परिवर्तन
पाश्चात्य संस्कृतीचे गरजेपार आकर्षण
केसांपासून नखांपर्यंत products हवेत शंभर
कुठल्याही fashion मध्ये पहिला माझा नंबर

weekends ला मित्रांसोबत असते जंगी party
घरी असेल आई तुमच्या काळजीत करत आरती
अक्कल गहाण तरी मी महान नशेमध्ये धुंद
बायका पोरांसमोर यांची होते छाती रुंद

आयुष्य धोक्यात टाकून देई आजारांना निमंत्रण
पैशाच्या पोकळ माजात सर्वनाशा आमंत्रण
अक्कल येते तेव्हा मात्र वेळ गेलेली असते
पुढची पिढी तुमच्यापेक्षा अधिक बिघडली असते

                                            - स्वप्नील वायचळ
« Last Edit: May 28, 2012, 05:07:40 AM by स्वप्नील वायचळ »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: खळबळ
« Reply #1 on: May 28, 2012, 10:12:25 AM »
vastav darshan....

Offline स्वप्नील वायचळ

 • Jr. Member
 • **
 • Posts: 182
 • Gender: Male
Re: खळबळ
« Reply #2 on: September 26, 2012, 01:34:08 AM »
Thank you kedar :)