Author Topic: माझ्या फुला  (Read 977 times)

Offline vidyakavita

  • Newbie
  • *
  • Posts: 9
  • Gender: Female
  • भावनांची दिवाळी अशीच उधळत राहू द्या - प्रवीण दवणे
माझ्या फुला
« on: June 12, 2012, 12:20:09 AM »
   माझ्या फुला आता भिऊन चालायचं नाही
  इतकी वाट चालून मागं फिरून पहायचं नाही
 
       गळायचं एकदा म्हणून का फुलायचं नसतं
       मरायचं एकदा म्हणून का जगायचं नसतं
       जग आपल्या पायात आहे असंही समजायचं नसतं
       पायाखालाच्या मातीला मात्र मायबाप समजायचं असतं
       असंख्य फुलांतही आपलं वेगळेपण जपायचं असतं 

  माझ्या फुला आता भिऊन चालायचं नाही
  इतकी वाट चालून मागं फिरून पहायचं नाही
 
       फुला तुझी सोबत करतो आहे तुझा कंद
       जीवाचा तू तुकडा म्हणत सोबत देतो आहे अखंड
       फुला तुझी फिकीर कळ्यानीही केली
       लसणाऱ्या काट्यांनीही आपली धार कमी केली
       
माझ्या फुला आता भिऊन चालायचं नाही
फुलावं लागेल तुला आता भिऊन चालायचं नाही

                                  by vidya anand
« Last Edit: June 12, 2012, 12:21:57 AM by vidyakavita »

Marathi Kavita : मराठी कविता