Author Topic: एकदाच बघ...  (Read 2935 times)

Offline designer_sheetal

  • Jr. Member
  • **
  • Posts: 64
एकदाच बघ...
« on: August 02, 2012, 12:05:38 PM »
एकदाच बघ... वाट वाकडी करून,
तिथेच असेल कदाचित तुझ्या स्वप्नांची नगरी

एकदाच बघ... खळखळून हसून,
दुखःही श्वास घेईल क्षणभर थांबून

एकदाच बघ... स्वतःवर विश्वास ठेवून,
आभाळही ठेगणं दिसेल तुझ्यासमोर

एकदाच बघ... जुन्या आठवणी पुसून,
नवे क्षितीज मिळेल नव्या भरारींना

एकदाच बघ... मागे वळून,
तुझीच सावली दिसेल साथ देताना

एकदाच बघ... आरशात निरखून,
सापडशील तू तूला तूझ्यातच

 
शीतल
 
http://designersheetal.blogspot.in
 
http://kaladaalan.blogspot.in/

 
« Last Edit: August 31, 2012, 12:51:38 PM by designer_sheetal »

Marathi Kavita : मराठी कविता