Author Topic: ........उतारवयाची चिंता  (Read 1152 times)

Offline avi10051996

  • Newbie
  • *
  • Posts: 27
  • Gender: Male
........उतारवयाची चिंता
« on: September 06, 2012, 09:44:21 PM »
........थोडी जाडी वाढली, काही केस रंग बदलू लागले
आजार पण येत आहेत.. मग झाले न वय ?
नटने सुटले,आरश्यातील भावही बदलू लागले
काळजीचे ढग येत आहेत.. मग झाले न वय ?

रात्रीच्या जागरणात,आठवणींचे गावही बदलू लागले
दूरचे तारेहि जवळ येत आहेत.. मग झाले न वय ?
चिंब होणे सुटले ,पाउसही रंग बदलू लागले
डोकेदुखी येत आहे.. मग झाले न वय ?

मोगरे फुलले,तेही सुगंध बदलू लागले
गंध संथपने येत आहे.. मग झाले न वय ?

Marathi Kavita : मराठी कविता