Author Topic: आपल्या आयुष्यात ...  (Read 3210 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
आपल्या आयुष्यात ...
« on: September 12, 2012, 09:17:38 PM »
आपल्या आयुष्यात ...ही  चित्रकविता पहायची असेल तर येथे  क्लीक  करा ..
http://ravindrabendre.blogspot.com/2012/09/blog-post_12.html

आपल्या आयुष्यात ...

आपल्या आयुष्यात जागोजागी पूर्णविराम आहेत
प्रसंग प्रसंगाला ते द्यावे लागत आहे ---दिले गेले आहेत ।
प्रसंगाप्रमाणेच पूर्णविराम
भावनांना, विचारांना, घटनांना
सुखाला,दुःखाला तसेच वेदनांना दिले  आहेत
जीवनांतील प्रश्न चिन्हां पुढेही
पूर्णविरामच आहेत
कारण त्यामागील प्रश्नांची उत्तरे
अजूनही अर्धवट लोंबकळत आहेत
टिंब-टिंब-टिंब मिळून रेघ बनते
जीवन म्हणूनच फक्त लकीर वाटते
अर्थहीन -दिशाहीन
फक्त पुढे सरकणारी
काळाच्या ओघाबरोबर                                     
फक्त क्षितिजापर्यंत  जाणारी
ह्याच रेघेत भावना अन  प्रसंग
गुंफले गेले आहेत   
आणखीही अनेक येणार आहेत
तसेच पूर्णविराम रहाणार आहेत---दिले जाणार आहेत ।।
   रविंद्र बेंद्रे
« Last Edit: September 12, 2012, 09:20:54 PM by Sadhanaa »

Marathi Kavita : मराठी कविता