Author Topic: निरपेक्ष भक्ति ...  (Read 1191 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
निरपेक्ष भक्ति ...
« on: September 30, 2012, 11:45:54 AM »
.

निरपेक्ष भक्ति                         
एकच आहे रीत जगाची  वाटे न काही त्यांत नवीन
जीवनात जेव्हा येती संकटे  मनात आठवितो मग भगवान ।
भेटेल का भगवान असा  मनी राहुनी  सापेक्ष
करावयाला भक्ती हवी  सदा सर्वदा निरपेक्ष ।
करत नसाल भक्ती त्याची  असाल जेव्हा सुखात
आठवूनीही उपयोग नाही  पडला जेव्हा संकटात ।
मिळत नाही जागी काही  एकाच एका प्रयत्नात
करिता मग अपेक्षा त्याची भक्तीच्या फक्त एक क्षणात ।
जीव जगविण्या लागते जशी  उत्कंठा प्राण वायूशी
उत्कट भक्ती असेल तर  प्रभूच येईल दाराशी ।
आनंद घेता जगती करुनी  उघड प्रदर्शन नास्तिकतेचे
घालावी का मग भीड प्रभुशी  थोतांड करुनी आस्तिकतेचे ।
पूजा अर्चा अन भक्ती ढोंगी  रुजू न होई प्रभूच्या चरणी
असेल प्रभूचा ध्यास मनी  ठेवा मनात सात्विक करणी ।
सखे सोयरे अन शेजारी  तेथेच प्रभूचा असे वास
उमजून हे गूढ अंतरी त्याच्या सेवेचा  घ्या ध्यास ।
करोनी निरपेक्ष पुण्य कर्म  भजावे प्रभूस एकांतात
प्रभू दर्शनाचे एकच मर्म  असे सर्व थोरसांगतात
करोनी निरपेक्ष पुण्य कर्म  भजावे प्रभूस एकांतात ।।
                                                             
        रविंद्र बेन्द्रेही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/09/blog-post_29.html
« Last Edit: September 30, 2012, 01:34:44 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता