Author Topic: दुभंगलेले हृदय माझे…  (Read 2381 times)

Offline Sadhanaa

 • Jr. Member
 • **
 • Posts: 311
दुभंगलेले हृदय माझे…
« on: October 14, 2012, 03:26:42 AM »
दुभंगलेले हृदय माझे… 

दुभंगलेले हृदय माझे   भंगल्या मंदिरा परि

प्रतिमेची साथ आहे   भंगून ती गेली तरी ।

मंदिराला शोभा चढते   गाभारीच्या प्रतिमेने

जीवनांत सुख मिळते   कोरलेल्या स्मृतिरेखेने ।

हृदयांतली स्मृतीरेखा   देव मूर्ती परि असते

मनाच्या गाभ्यांत एका  अंधूक तशी स्पष्ट दिसते ।

मोक्षप्राप्ति मिळविण्याला  भक्तीचा मार्ग असतो

जीवनांत सुखी होण्याला  कल्पतरु स्मृतींचा असतो ।।   

  रविंद्र बेंद्रे

ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/10/blog-post_13.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: दुभंगलेले हृदय माझे…
« Reply #1 on: October 15, 2012, 11:28:56 PM »
मोक्षप्राप्ति मिळविण्याला  भक्तीचा मार्ग असतो

जीवनांत सुखी होण्याला  कल्पतरु स्मृतींचा असतो

khup chan sadhnaji...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline Sadhanaa

 • Jr. Member
 • **
 • Posts: 311
Re: दुभंगलेले हृदय माझे…
« Reply #2 on: October 16, 2012, 01:19:19 AM »
thanks

Offline Vaishali Sakat

 • Jr. Member
 • **
 • Posts: 161
Re: दुभंगलेले हृदय माझे…
« Reply #3 on: November 02, 2012, 11:32:18 AM »
Very Nice.......