Author Topic: ।। कधी-तरी ।।  (Read 2099 times)

।। कधी-तरी ।।
« on: November 05, 2012, 02:09:17 PM »
।। कधी-तरी ।।

कधी तरी गावे जीवनाचे गाणे
सुर-तालावाचून व्हावे तराणे
घूमावा नाद गगनांतरी
फिरुनी ऐकावी तीच बासरी

कधी तरी खेळावे रंग नाना-परि
इंद्रधनू जणू यावे भू-वरी
उगवती-मावळतीचा चोरावा रंग
रंगात रंगूनी जावे अंतरंग

कधी तरी वेचावे चांदण्यांचे मोती
चंद्रवेडा चकोर व्हावे चांदराती
सागराची गाज ऐकावी एकांती
आकाश-धरेची न्याहाळावी प्रीती               - श्रीमति प्रतिभा गुजराथी

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: ।। कधी-तरी ।।
« Reply #1 on: November 06, 2012, 11:46:22 AM »
chan kavita