Author Topic: ॥ऐक सखी तू॥ @UP*  (Read 1175 times)

Offline pujjwala20

  • Newbie
  • *
  • Posts: 45
॥ऐक सखी तू॥ @UP*
« on: March 08, 2014, 11:13:53 AM »

॥महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा॥

~ ऐक सखी तू ~

ऐक सखी तू
विज्ञान युगाच्या
२१ शतकाच्या
उमरठ्यावर पाऊल ठेवताना
तुझ्या कितीतरी भगीनींचे बळी
आज ही सढळ आणि डोळ्यादेखत
भर गर्दीत जाताहेत
तू या सार्यापासून
निश्चितच अनभिज्ञ नाहीस
परंतु या सार्याचा
तुझ्या मानसिकतेवर
फारसा परिणाम होत नाही
पण लक्षात ठेव
हिच घटना उद्या
येवू शकेल तुझ्या दारापर्यंत
त्या आधी तू जागी हो
या हिंस्र आणि रक्तपिपासू
नराधमांना तूच आवर
कधी किरण बनून
कधी ईंदिरा बनून
तूच यांच्यातील मानवता सावर
कधी मदर तेरेसा बनून
तर कधी जीजावू बनून
व्यापून टाक प् थ्वी एवढिशी
आकांक्षापुढती तुझ्या जी तोकडी

¤ ¤ ¤ उज्ज्वला पाटील @UP*

Marathi Kavita : मराठी कविता