Author Topic: तुला मत देणार नाहीं...Watch New Video  (Read 1941 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
तुला मत मिळणार नाहीं 
                     

एकदां आपटी खाल्ली तरी   अक्कल अजून येत नाहीं
म्हसणांत गोवर्यां गेल्या तरी  सत्तेची हांव सुटत नाहीं.. सुटणार नाहीं ।
केंस सारे पिकून गेले  शरीरांत फक्त हाड उरले
तेंही अंग कांपू लागले  तरीही मोह आवरत नाहीं .. आवरणार नाहीं ।
हिंदी,मराठी अन् मल्याळी  भाषा असे परकी सगळीं
इंग्रजी फक्त उतरते गळीं  तिच्या शिवाय बोलत नाहीं .. बोलणार नाहीं ।
जनतेबद्दल प्रीति नाहीं  देश हिताची आंच नाहीं
सत्याचीही चाड नाहीं   हें गुण त्याचे बदलत नाहीं .. बदलणार नाहीं ।
बगलबच्चे असती 'नाळ'  नाचती सोडून सगळा ताळ
उखडण्या जनता घेणार फाळ  तरीही उभे रहाणे सुटत नाहीं ..सुटणार नाहीं ।
पडलों जरी मुंबईतून  उभा राहीन केरळातून
तिथे पडलो तर आणि कुठून  जिंकल्या शिवाय रहात नाहीं .. रहाणार नाहीं ।
हपापपला हा सत्तेसाठी  पार्लमेंटात बसण्यासाठी
हट्ट हा पुरवण्या साठीं  हा काही करणे सोडत नाहीं .. सोडणार नाहीं ।
मतें देऊन या उपरयाला  जाणार कां तूं नरकाला
सांगा त्या देशबुडव्याला  तुला मत मिळत नाहीं .. मिळणार नाहीं ।।     
 

  रविंद्र बेंद्रे
Please Click on this to watch this video
https://www.youtube.com/watch?v=ZR2W2p82myk&feature=g-upl

Marathi Kavita : मराठी कविता


Offline balrambhosle

  • Jr. Member
  • **
  • Posts: 122
  • Gender: Male
Re: तुला मत देणार नाहीं...Watch New Video
« Reply #1 on: December 31, 2012, 09:35:23 PM »
 :)