« on: February 09, 2010, 10:29:19 AM »
चौपाटीवर
माळवत नाही सूर्य आता
पूर्वी जसा माळवत होता
खवळत नाही दर्या आता
पूर्वी जसा खवळत होता
चौपाटीच्या दर्यामधले
मासे सगळे वाहून गेले .
पागणा - यांच्या पांगल्या होड्या
कोळ्यांचे तर तुटले जाळे
चौपाटीची भेळ आता
पूर्वीसारखी खाववत नाही
शहाळ्यांतले पाणी आता
काही केल्या पिववत नाही
कश्तीवाला कावसबावा
आता जोडीत नाही हात
शेंगा गंडेरीशी भांडून
झाली पुरती वाताहात
चौपाटीच्या सभेत आता
आडवे बांबू करतात दाटी
स्विमिंगपूलशी गर्दी जमते
तरण्यापेक्षा चरण्यासाठी
‘ कडकचंपे ’ चंपीवाला
चोळीत बसतो आपलेच पाय
चौपाटीचा चणेवाला
आपले चणे आपण खाय !
« Last Edit: February 09, 2010, 10:31:41 AM by gaurig »

Logged