मार्क्सविरोधी
पंचवीस मार्क कमी पडून
नापास झालेले चिरंजीव
तीर्थरुपांना म्हणाले ,
' मी पहिल्यापासूनच
मार्क्सविरोधी गटात आहे
छान दिसतेस
एकदा तुम्ही मला
छान दिसतेस म्हणालांत
पण ' समोरच्या सरोजबाईसारखी '
हे शब्द जोडून...
सुटलो
बहात्तर कादंब - या लिहिणारी
माझी थोर साहित्यिक आत्या
दम्याने पंचाहत्तराव्या वर्षी वारली
तेव्हा ' सुटली ' म्हणायच्या ऐवजी
तुम्ही ' सुटलो ' म्हणालात
चांगलेसे स्थळ
माझ्या खोलीतल्या फोटोतली तरुणी
परवा मला म्हणाली ,
' मला चांगलेसे स्थळ शोधून द्या ना-
इथे माझा जीव टांगल्यासारखं वाटतंय