जेंव्हा ऑफिसला जाते आई ....!
पाळण्यात रडायला झाले तरी काय
बघ हंबरते गोठ्यात वासराची गाय
धीर धर थोडा अशी करू नको घाई
येईल ग क्षणातच तुझी धावूनिया आई......
ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना
ऑफिसात जाते तुला सकाळी पाजून
पाळण्यात घेशी तु ही मुकाट निजून
बाटलीच्या दुधाने तुझी भूक भागेना गं
ऑफिसात कामा तिचे मन लागेना गं
सोडूनी तुला जाण्या तिला करमत नाही.................
ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना
सोडुनिया जाता तुला तिला वाटतोय खेद
पण तुझ्या भविष्याचा तिला लागलाय वेध
सोडुनिया जॉब तुझ्या सवे बसायला
आवडेल तिला तुझ्या सवे हसायला
पण कमी पडे तुझ्या बाबाची कमाई............
ना ना ना ना ना ना ना ना ना ना
असे कसे आई बाबा आले तुझ्या नशिबास
वर्तमान विसरले बघताना तुझ्या भविष्यास
उब ,माया , प्रेम , आता देईल ते कोण ?
राहील का सारे आता एक कहाणी बनून?
कसे होतील हे तुझ्या ऋणातून उतराई .....
ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना
------ देव हळदे