मित्रानो संदीपच्या थकलेल्या बाबाची कहाणीला
मी एक छोटेसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे
झामले का सांगा ह्न please
थकलेल्या बाबाची मी ऐकली हि कथा
आने डोळ्यात पाणी माझ्या बाबाची व्यथा
दुख तुझे थोडे फार कळतेय मला
बाबा तुझ्यासाठी माझा जीव कासावीस झाला
ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना
लाड लाड करताना पाठीवर घेशी
झोप येता देशी मला हाताची उशी
मागण्या आधी सारे पुढ्यातच येई
साऱ्यासाठी तुझी किती दमछाक होई
दिलेस ते सारे ज्याचा अट्टाहास केला
बाबा तुझ्यासाठी माझा जीव कासावीस झाला
ना ना ना ना ना ना ना ना ना ना
डोळ्यात येता पाणी तुझे डोळे झाले ओले
ठेस लागताच मला तुझे डोळे पाणावले
आजारी मी होता तिथ जागलाय कोण
वाचले मी बाबा तू होतास म्हणून
चूक झाली तरी कधी नाही हाथ उगारला
बाबा तुझ्यासाठी जीव कासावीस झाला
ना ना ना ना ना ना ना ना ना
घाई कारे तुला झाली सासरी धाडण्याची
जीव लाऊन लाऊन घराबाहेर काढण्याची
सोडून तुला जाता माझ्हा अडकेल श्वास
खर संग बाबा तुला मी दिला काय त्रास
सोडुनिया जाता तुला कंठ दाटुनिया आला
तुझ्यासाठी बाबा जीव कासावीस झाला
ना ना ना ना ना ना ना ना ना ना
------ देव हळदे