सलील आणि संदीप द्वयींची ’दमलेल्या बाबाची....’ ऐकताना, समोर एक लहानसं पिल्लू डोळे पुसताना दिसलं, वाटलं, खरोखर... दुर देशी गेलेल्या बाबाची वाट पाहताना त्या पिल्लाच्या मनात काय विचार येत असतील आणि नकळत ही कविता जन्माला आली. सांगा कशी वाटते ती...
ए आई, सांग ना, कधी येइल बाबा घरा?
ए आई……,सांग ना SSSSS!
आता गोष्ट नको आम्हाला,
गाण्यातला रस संपला!
लुटुपुटीच्या भातुकलीचा,
आला खुप खुप कंटाळा SSSS!
ए आई, सांग ना SSSSS, कधी येइल बाबा घरा?
नकोच आई मजला,
चॉकलेटचा तो बंगला !
अन बर्फीची ती झाडे,
इथे आहेत, हवी SSSS कुणाला?
ए आई, सांग ना SSSSS, कधी येइल बाबा घरा?
राजपुत्र अन परीराणीच्या,
गोष्टींचा स्टॉकही संपला !
टॉम अँड जेरी, पापायनेही,
बघ जीव; आमचा SSS उबला !
ए आई, सांग नाSSSSS, कधी येइल बाबा घरा?
चिवचिव करती चिमणपिले,
चोचीतच घास राहीला !
असेल का गं गेला ?
त्यांचाही बाबा टूरSSS ला?
ए आई, सांग नाSSSSS, कधी येइल बाबा घरा?
बघ चांदोबा तो रुसला,
चांदण्याही…, बघ धुसफुसल्या !
अंगाई नच रुचे आम्हाला,
आम्हा हवाय बाबा……, थोपटायलाSSSSS !
ए आई, सांग नाSSSSS, कधी येइल बाबा घरा?
विशाल.