Author Topic: एकदा माझी बायको म्हटली - संदीप खरे  (Read 6490 times)

Offline Prathamesh_84

  • Newbie
  • *
  • Posts: 4

एकदा माझी बायको म्हटली
आरश्यामध्ये बघत चंद्र
आणि चंद्रावरती लावत थीट....
बघ बघून कळलंच जर तर
जास्त झालंय भाजीत मीठ.....

एकदा माझी बायको म्हटली
चुकल्या वरती रडत राहीन,
माझे डोळे सरोवर....
तुझं सगळ खर
तरी माझंच सगलं बरोबर....

एकदा माझी बायको म्हटली
तू म्हणजे लुच्चा, लबाड
१ नंबर नतद्रष्ट...
उपकार करा, घरी या
काढून टाकीन म्हणते द्रुष्ट....

एकदा माझी बायको म्हटली
संपल सार, सुटलं सार
नाहीच आता जमायचं....
उंबरठ्याशी ये ना,
अडव... माळून फुल चाफ्याचं...

एकदा माझी बायको म्हटली
वाटत नाहीस माझा,
तरी माझ्याशिवाय नसलेला...
पाय धरत १७ वेळा
डोक्यावरती बसलेला....

- संदीप खरे