Author Topic: संदीपची नवीन कविता - हृदय फेकले तुझ्या दिशे&#  (Read 4852 times)

Offline shardul

 • Jr. Member
 • **
 • Posts: 186
साधारणपणे ऑक्टोबर २००७ मध्ये संदीपनी लंडनमध्ये लिहिलेली ही कविता आहे :-


हृदय फेकले तुझ्या दिशेने
झेलाया तू गेलीस पटकन्‌
गफलत झाली परि क्षणांची
पडता खाली फुटले खळ्‌कन्‌


हृदय फेकले तूही जेंव्हा
सुटले तेही,पडलेही पण
तुटले नाही-फुटले नाही
नाद निघाला केवळ खण्‌कन्‌


गोष्ट येवढी इथेच थांबे
अशा गोष्टींना नसतो नंतर
खळ्‌कन्‌ आणि खण्‌कन्‌ यांतील
कधी कुठे का मिटले अंतर


मन पोलादी नकोच तुजसम
असो असूदे काच जरीही
फुटून जाते क्षणी परंतु
गंजायाची भीती नाही

--- संदीप खरे.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Karuna Sorate

 • Newbie
 • *
 • Posts: 32
 • Gender: Female

Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....