Author Topic: उफराटे हिशोब माझे  (Read 3786 times)

Offline shardul

 • Jr. Member
 • **
 • Posts: 186
उफराटे हिशोब माझे
« on: December 30, 2009, 10:17:47 PM »
संदीपची नवीन कविता (गझल) - उफराटे हिशोब माझे
नमस्कार !

संदीपची एक नवीन गझल पोस्ट करत आहे. ती गझल त्याला सुरेश भट यांच्या गझलवरून सुचली आहे असं तो प्रोग्रॅममध्ये म्हणाला. म्हणून ती मूळ गझलसुद्धा पोस्ट करत आहे.


इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते?

मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते

नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते

घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते

--- सुरेश भट.

आता संदीपची गझल :-
( ही गझल टाळ्यांची गझल आहे. म्हणजे प्रत्येक कडव्यानंतर प्रचंड टाळ्या येतात )उफराटे हिशोब माझे
कोणाला कळले होते
मन ओले होते माझे
अन् म्हणून जळले होते

मी वजा जमेतून होतो
अन्‌ जमा वजेस्तव होतो
हे गणित समजले तेंव्हा
आयुष्य निवळले होते

नवनीत सुखाचे आले
शब्दांच्या पात्रांवरती
मी आईच्या हातांनी
बघ दुःख घुसळले होते

जगण्याच्या पानावरती
स्वप्नांशी जमल्या गप्पा
मग मुहूर्त मरणाचेही
कंटाळून टळले होते

दुसर्‍या दिवशी दुःखांचा
बघ वासही आला नाही
नयनांचे पेले माझ्या
रात्रीच विसळले होते

--- संदीप खरे.

Marathi Kavita : मराठी कविता

उफराटे हिशोब माझे
« on: December 30, 2009, 10:17:47 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: उफराटे हिशोब माझे
« Reply #1 on: December 31, 2009, 07:59:20 PM »
इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

hya oli chhan ahet  :(

Offline Shyam

 • Jr. Member
 • **
 • Posts: 214
 • Gender: Male
Re: उफराटे हिशोब माझे
« Reply #2 on: March 11, 2010, 10:56:25 PM »
दुसर्‍या दिवशी दुःखांचा
बघ वासही आला नाही
नयनांचे पेले माझ्या
रात्रीच विसळले होते...

ek number........

Offline vidu_92

 • Newbie
 • *
 • Posts: 1
Re: उफराटे हिशोब माझे
« Reply #3 on: June 18, 2010, 01:06:42 AM »
 :'( manala sparshun geli ..... khas karun shewatch kadava.....

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):