Author Topic: संदीपची मी ऐकलेली ही पहीली कविता....महानच आहे  (Read 26439 times)

Offline marathi

 • Jr. Member
 • **
 • Posts: 212
हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही
हसलो म्हणजे दुखीः नव्हतो ऐसे नाही

हसलो म्हणजे फ़क्त स्वतःच्या फ़जितीवर
निर्लज्यागत दिधली होती स्वतःच टाळी
हसलो कारण शक्यच नव्हते दुसरे काही
डोळ्यामधे पाणी नव्हते ऐसे नाही

हसतो कारण तुच कधी होतीस म्हणाली
याहुन तव चेहर्‍याला काही शोभत नाही
हसतो कारण तुला विसरणे जितके अवघड
तितके काही गाल पसरणे अवघड नाही

हसतो कारण दुसर्‍यानांही बरे वाटते
हसतो कारण तुला सुद्धा ते खरे वाटते
हसलो म्हणजे फ़क्त डकवली फ़ुले कागदी
आतुन आलो होतो बहरुन ऐसे नाही

हसतो कारण जरी बत्तीशी कुरुप आहे
खाण्याची अन दाखवण्याची एकच आहे
हसतो कारण सत्याची मज भिती नाही
हसतो कारण हसण्यावाचुन सुटका नाही....


"हसलो" च्या जागी "हसतो" नक्की कुठल्या कडव्यात सुरु होते यामध्ये confusion आहे....pls correct if its wrong....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
mastach  ;D
हसतो कारण जरी बत्तीशी कुरुप आहे
खाण्याची अन दाखवण्याची एकच आहे
हसतो कारण सत्याची मज भिती नाही
हसतो कारण हसण्यावाचुन सुटका नाही....

Offline omkar.dm112

 • Newbie
 • *
 • Posts: 5
हसतो कारण जरी बत्तीशी कुरुप आहे
खाण्याची अन दाखवण्याची एकच आहे
हसतो कारण सत्याची मज भिती नाही
हसतो कारण हसण्यावाचुन सुटका नाही....


aprateem

Offline yuvrajnarewade

 • Newbie
 • *
 • Posts: 3

Offline supriya joshi

 • Newbie
 • *
 • Posts: 14
 • Gender: Female
« Last Edit: November 17, 2011, 05:36:34 AM by supriya joshi »

रणदीप खोटे

 • Guest
संदीप खरे हा कवी एवढा काही चांगला नाई हं. त्याची एकच चांगली कविता ती म्हणजे कसे सरतील सये.

बाकी निव्वळ पोकळ लिहीतो हो. पण लोकांना कवितेची जाण नसल्यामुळे असे पोकळ लोकच मोठे केले जातात.

अरे मनोहर ओक काय लिहायचा वा जी वा उद्धव शेळके, दिपुचित्रे वा वा संदीप खरे हा गल्लीसम्राट कवी आहे.

चांगली कविता वाचा मग कळेल

Offline Tinkutinkle

 • Jr. Member
 • **
 • Posts: 58
Itaki tokachi tika karaychi garaj nahi.Tumhi Sandip chya uttam kavita vachalya nastil.arthat tyachya sagalyach kavita chhan astat.pan tyachi nenavichi akshare aani maunanchi bhashantare hi pustaka vacha.nahitar mag tyacha show attend kara.aadhi janun ghya mag bola.
Sandip attishay uttam kavi aahe.

vinay deshpande

 • Guest
sandip khare changale kavi ahet yabaddal vad nasava ,gane /lihne bhale bure te to devagharche dene

vinay deshpande

 • Guest
sandip khare changale kavi ahet ya baddal vad nasava .Gane/kavita lihane he to devagharche dene BHale bure god manave

Mandar bapat

 • Guest
its too good..... kas shabd suchtat ewdhe???? :)