कसे सोडतील सये,
भाऊ मला तुझे असे,
सोडताना आणि सांग सोलतील ना,
गुलाबाची फुले जर दिली तुला रस्त्यावर..
धरु धरु मला सांग हाणतील ना..हाणतील ना....
चाबकाचा मारा मारा सोसताना देह सारा..
दुखे दुखे तन माझे पुरे
अंगावर ठसे ठसे कपडेही कसेबसे..
खोल खोल सुज आत शीरे..
दशा होइ वेडी खुळी त्वचा पण काळी निळी..
बघताना हापकून बसशील ना...
रोज तुझ्या गाडीतुन येइ उजडा चमन,
लागु देत नाही मला हवा,
लगे त्याला कळेलच आणि तेव्हा मारेलच,
कोण खेटावे तुझ्या भावा.
शरीराचे कोटी कण फटक्यांचे सारे व्रण..
रोज रोज आणखीच दुखतील ना..
आत नाही बोलायाचे जरा जरा जगायाचे,
पाळुनीया अंतर बरे,
क्षणभर जगु देत पायवर चालु देत,
नाहीतर माझे काय खरे.
जरा काळ सरु देना भाउ कुठे जाउ देना,
तेव्हा तुला काय हवे पुरवील ना...
गुलाबाची फुले जर दिली तुला रस्त्यावर..
धरु धरु मला सांग हाणतील ना..हाणतील ना....
- शशांक प्रतापवार ३०-११-२००९