Author Topic: कवितांना शुन्य प्रतिसाद!  (Read 14167 times)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!

रसिक मित्रानो!
MK च्या कविता वाचताना माझे असे लक्षात आले कि काही कवितांना ५०० किंव्हा १००० पेक्षा जास्त वेळा रसिकांनी वाचलेल्या दिसतात पण प्रतिसाद मात्र शुन्य असतो! मला वाटतं प्रत्येक कवितेला आपण प्रतिसाद दिला पाहिजे जेणेकरून तो नवोदित कवी अधिकाधिक चांगलं  लिहायचा प्रयत्न करील! चार ओळी नाहीत तर फक्त एक smiley किंव्हा thumps up आपण नक्कीच देऊ शकतो! MK admin नेही असा message web site वर नेहमी blink करत ठेवावा असे वाटते!

मिलिंद कुंभारे  :) ;) :D ;D >:( :( :o 8) ??? ::) :P :-[ :-X :-\ :-* :'(

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: कवितांना शुन्य प्रतिसाद!
« Reply #1 on: March 21, 2013, 12:33:56 PM »
@ मिलिंद कुंभारे :
तुमच्या मताशी मी सहमत नाही... इथल्या प्रत्येक कवितेवर प्रतिसादासाठी कुणावरही जबरदस्ती नसावी असे मला वाटते... जर एखाद्याला मनापासून एखादी कविता आवडली आणि वाटलं तर तो प्रतिसाद नक्की देईल... आणि एखादी कविता जर मनापासून आवडली तरच तिला चांगला प्रतिसाद द्यावा असे मला वाटते ... फक्त कवीला बरे वाटावे, त्याने अधिकाअधिक चांगले लिहावे म्हणून काहीही लिहिलेल्याला छान आहे असे म्हण्यात काही अर्थ नाही... अश्याने तो नवकवी कवितेच्या नावाखाली काही हि वायफळ लिहू शकतो... असे हि प्रत्येकाला दिवसभर इथे यायला वेळ असतोच असे नाही.. ज्याला जसा आणि जितका वेळ मिळतो तसा तो MK वर येतो... जर एखाद्याला दिवसभरात फक्त १० मिनिटेच मिळत असतील इथे यायला तर त्या वेळेत तो अधिकाअधिक चांगल्या कविता वाचेल कि कवितेच्या नावावर काहीही लिहिलेले असले तरी त्यांना प्रतिसाद देण्यात वेळ घालवेल? माझी हि प्रतिक्रिया एक वाचक म्हणून आहे ... मी कुणी कवयत्री नाही... चांगले कवी घडवण्यासाठी इथे वाचक नक्कीच येत नसतील... ते फक्त चांगल्या दर्जेदार कविता वाचण्यासाठी आणि एखादी कविता जर मनापासून आवडली तर त्याला प्रतिसाद देण्यासाठी येतात असे मला वाटते ...... एक कवी म्हणून तुमच्या प्रत्येक कवितेला प्रतिसाद मिळालाच पाहिजे अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे ..... काही जणांना कविता आवडली तरी प्रतिसाद देता येत नाही कारण तेवढा वेळ हि नसतो त्यांच्याकडे ...... आपली कविता ५०० किंवा १००० लोकांनी वाचली यातहि एक प्रकारचे समाधान आहे .. नाही का?

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: कवितांना शुन्य प्रतिसाद!
« Reply #2 on: March 21, 2013, 02:06:46 PM »

क्षमा असावी

इथल्या प्रत्येकच कवितेला प्रतिसादास द्यावा असे मलाहि वाटत नाही...पण अनेकदा आपल्याला कविता आवडते पण तरीही आपण प्रतिसाद देत नाहीत....ही सर्वसाधारण माणसांची वृत्ती असते असे माझे मत आहे अन ती बदलावी असे मला वाटते....कुणीही कवितेच्या नावाखाली काही हि वायफळ लिहिले तरीही त्याला प्रतिसाद द्यावा असे मला मुळीच म्हणायचे नाही....

मी एम के वर येउन ८-१०  दिवसच झालेत, पण सुरवातीचे १-२ दिवस मी नुसतेच कविता वाचल्या, काही कविता मला खूप आवडल्याही पण कुठल्याच कवितेला मी प्रतिसाद दिला नाही! तसेच जस जसा मी एम के च्या कविता बघू लागलो तेव्हा असे लक्षात आले कि काही कवितांना ५०० किंव्हा १००० पेक्षा जास्त वेळा रसिकांनी वाचलेल्या,  पण प्रतिसाद मात्र शुन्य होता! त्यातल्या काही कविता खरच चांगल्या होत्या! आता प्रत्येक चांगल्या कवितेला मी आवर्जून प्रतिसाद देत असतो आणि  एम के च्या रसिक काविनीही तसे करावे असे माझे मत आहे! तसेच आपली मराठी भाषा व साहित्य संमृद्ध करायचे असेल तर थोडा फार वेळ आपण त्याच्यासाठी द्यायलाच हवा असे मला वाटते.....त्याची कविता ५०० किंवा १००० लोकांनी वाचली यात एक प्रकारचे समाधान आहे यांत शंकाच नाही.. पण त्याने ५०० किंवा १००० पेक्षा जास्त चांगल्या कविता लिहाव्यात असे मला वाटते!

हि चर्चा मी माझ्या व्ययक्तिक कवितांना जास्त प्रतिसाद मिळावा म्हणून सुरु केलेली नाही तर त्यातून नव नवीन चांगल्या कविता रसिकांना वाचायला मिळाव्यात हा त्यामागचा उद्देश आहे!

काही चुकीचे लिहिण्यात आले असल्यास क्षमा असावी!

मिलिंद कुंभारे

Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: कवितांना शुन्य प्रतिसाद!
« Reply #3 on: March 21, 2013, 02:27:49 PM »
tuzi suruvatichi post tu punha ekda vach .......... ase savistar lihile asates tyat tar mala pratisad denyacha trasach ghyava lagla nasata :P .... tuzya sathi punha tuze te vakya post karatey je mala khatakale ani mi reply kela :)
मला वाटतं प्रत्येक कवितेला आपण प्रतिसाद दिला पाहिजे जेणेकरून तो नवोदित कवी अधिकाधिक चांगलं  लिहायचा प्रयत्न करील!

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: कवितांना शुन्य प्रतिसाद!
« Reply #4 on: March 21, 2013, 02:35:44 PM »
क्षमा असावी

मी माझ्या ओळी दुरुस्त करून पुन्हा लिहितो!

मला वाटतं प्रत्येक चांगल्या कवितेला आपण प्रतिसाद दिला पाहिजे जेणेकरून तो नवोदित कवी अधिकाधिक चांगलं  लिहायचा प्रयत्न करील!

मी फक्त एक शब्द न लिहिल्यामुळे तुम्हाला खूपसं लिहावं लागलं त्याबद्दल क्षमा असावी!

धन्यवाद!

मिलिंद कुंभारे

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: कवितांना शुन्य प्रतिसाद!
« Reply #5 on: March 21, 2013, 03:17:30 PM »
ata he vichar manthan thambavuyat ani kavita vachuyat :)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: कवितांना शुन्य प्रतिसाद!
« Reply #6 on: March 21, 2013, 03:28:39 PM »

नक्कीच!

 अन कविता वाचून झाल्यावर ती आवडल्यास आवर्जून प्रतिसाद देऊया!

मिलिंद कुंभारे  :) ;) :D ;D >:( :( :o 8) ??? ::) :P :-[ :-X :-\ :-* :'(

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: कवितांना शुन्य प्रतिसाद!
« Reply #7 on: March 21, 2013, 04:18:41 PM »
मिलिंद दादा,
मी सहमत आहे तुझ्या मताशी.....खरतर प्रतिक्रिया हि च तर पोच पावती असते न आपल्या कवितेची.....!

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: कवितांना शुन्य प्रतिसाद!
« Reply #8 on: March 21, 2013, 04:23:49 PM »
मधुरा ताई!
दाद दिल्याबद्दल धन्यवाद! :) :) :)

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: कवितांना शुन्य प्रतिसाद!
« Reply #9 on: April 01, 2013, 08:33:15 PM »
facebook var like cha chota clik asto .tase kahi karata yeyil ka?